आता कोचिंग क्लासेसमध्ये मोफत शिकवणी; लाॅकडाऊनचा परिणाम 
मुंबई

आता कोचिंग क्लासेसमध्ये मोफत शिकवणी; लाॅकडाऊनचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याची अनिश्चितता आहे. त्यातच अभ्यासक्रमात कपात करण्याबाबत विचार होत आहे. सध्याच्या अनिश्चित वातावरणामुळे कोचिंग क्लासचा प्रतिसाद कमी झाला आहे. क्लास सुरु ठेवण्यासाठी अनेक क्लासनी शुल्कात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. 

कोचिंग क्लासनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यात काहींनी वर्षाचे शुल्क दिल्यास काही कोर्स मोफत शिकवण्याची तयारी दाखवली आहे. या कोर्सचे शुल्क कोरोनापूर्वी काही हजार होते. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद झाली तसेच कोचिंग क्लासही. उन्हाळी सुटीत क्लास पूर्ण बंद राहिले. आताही काही जणांसमोर क्लासच्या जागेचे भाडे देण्याचा प्रश्न गंभीर झाली आहे. 

कोचिंग क्लासमध्ये स्पर्धा कमालीची आहे. त्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरु झाली तरी परिक्षा सुरु होतील, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे अनेकजण क्लासचे महागडे शुल्क देण्यास तयार नाहीत. आता त्यांना आकर्षित करण्यासाठी क्लास जास्त आतूर झाले आहेत. काही क्लासनी थेट प्रत्येक विषयासाठी क्लास सुविधा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठीचे मासिक शुल्क अडिचशेपर्यंत खाली आणले आहे, तर काही क्लासनी वार्षिक शुल्क 30 हजारावरुन दहा हजारपर्यंत कमी केले आहे. 

आम्हाला पालकांचाही विचार करायला हवा. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, तर काहींच्या पगारात मोठी कपात झाली आहे. या परिस्थितीत अनेक पालक मुला मुलींनी स्वतःच अभ्यास करावा असेच सांगत आहेत. आपण घरीच असल्यामुळे मुलांच्या अभ्यासकडेही लक्ष देता येईल असा विचार पालक करीत आहेत, या परिस्थितीत आम्हाला शुल्क कमी करुन विद्यार्थ्यांना आकर्षित करावे लागेल असे कोचिंग क्लास प्रमुख सांगतात. 

कोचिंग क्लास प्रमुखांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जेईई, एनईईटच्या परिक्षांच्या पूर्वतयारीसाठी एकत्रित पॅकेज कमी रकमेत दिले आहे. त्यातही सध्या ऑनलाईनला पसंती दिल्यास शुल्क कमी करण्याची तयारी दाखवली जात आहे. काही क्लासनी तर आत्ता शिका, नंतर शुल्क भरण्याची सुविधाही दिली आहे. काही छोट्या क्लासनी एकत्र आले आहेत. ते व्हिडिओ शेअर करीत आहेत आणि त्याद्वारेही खर्च कमी करीत आहेत.

महत्तवाची बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : भारतात मॉन्सून वाटचालीस अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा अंदाज अचूक; बंगालच्या उपसागरात तीव्रता वाढली

SIR Voter List : निवडणूक आयोगाचा मास्टरप्लॅन! बिहार, बंगालनंतर आता महाराष्ट्र-दिल्लीसह 'या' राज्यांत होणार मतदार याद्यांची सखोल तपासणी; 36 कोटी मतदारांवर लक्ष

मला लागेल ना बाबा... वैभव सूर्यवंशीसारखं बनवण्याचा हट्टापायी चिमुकल्याला पालकांनी जबरदस्तीने करयाला लावली बॅटिंग; वेगात येणारे चेंडू पाहून...

जयवंत वाडकर यांच्या लेकीचं शुभमंगल! मल्याळी बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

'अनुष्काचं आता वय दिसायला लागलंय' नव्या जाहिरातीतील अनुष्का शर्माचा लूक पाहून नेटकरी म्हणाले...'अरे ही ओळखता पण...'

SCROLL FOR NEXT